DHE Pune

Government of Maharashtra

Directorate of Higher Education

Maharashtra State, India

आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण

आरक्षण धोरणाच्या अचूक अंमलबजावणीसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

दिनांक २५ मे २०२६ | MSFDA, पुणे

मा. मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे येथे दि. २५ मे, २०२६ रोजी आरक्षण धोरणाच्या अचूक अंमलबजावणीसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज दिमाखात शुभारंभ झाला.

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील उपकुलसचिव, सहायक कुलसचिव व मागासवर्ग कक्ष कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम खास आयोजित करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक उपक्रम मा. मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या दूरदृष्टी व प्रेरणादायी मार्गदर्शनातून साकार झाला आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांची विशेष उपस्थिती लाभली.संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले की, NEP 2020 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासन बळकट असणे आवश्यक आहे. आरक्षण धोरण अचूकपणे राबविले तरच समाजातील सर्व घटकांना उच्च शिक्षणात न्याय मिळेल.

बिंदुनामावली तपासणी, सामाजिक आरक्षणासोबत महिला व दिव्यांग यांचे समांतर आरक्षण अचूकपणे कसे राबवावे, याबाबत या कार्यक्रमात सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. NEP 2020 च्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.