DHE Pune

Government of Maharashtra

Directorate of Higher Education

Maharashtra State, India

निसर्गाच्या सानिध्यात उच्च शिक्षण : शिंदवणे घाट येथे वृक्षारोपण अभियान

निसर्गाच्या सानिध्यात उच्च शिक्षण : शिंदवणे घाट येथे वृक्षारोपण अभियान

१० जानेवारी २०२६ | पुणे

महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षणाचे प्रशासन व व्यवस्थापन पाहण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी उच्च शिक्षण संचालनालयावर ( DHE) आहे. विद्यापीठे, महाविद्यालयांचे आर्थिक नियोजन, संस्थांचे नियमन, विद्यार्थी व प्राध्यापकांसंबंधी विविध प्रशासकीय कार्ये ही सातत्याने पार पाडली जातात. संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी आपली कर्तव्ये अत्यंत प्रामाणिकपणे, दक्षतेने व विवेकबुद्धीने पार पाडत आहेत. प्रशासकीय कामाचा मोठा ताण असतानाही ते आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवतात.

पर्यावरण संरक्षणाबाबत असलेली ही संवेदनशीलता पुणे शहरात राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमातून स्पष्टपणे दिसून येते. DHE कर्मचाऱ्यांकडून निसर्गसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत शिंदवणे घाट येथे भव्य वृक्षारोपण अभियान राबवण्यातआले.

शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ७ वाजता झालेल्या या अभियानात डॉ.शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. अर्चना बोऱ्हाडे, सहसंचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या नियोजनाखाली उच्च शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उस्फूर्तपणे सहभागी झाले.

“निसर्गाच्या सानिध्यात उच्च शिक्षण” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत या उपक्रमातून पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता .

wpChatIcon
    wpChatIcon