DHE Pune

Hostels

योजनचे नाव :- आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांची वसतिगृहे

योजनचे नाव :- आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

योजनचे स्वरूप :- आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवासाच्या सोयी, सुविधा उपलब्ध होण्यासाठी शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. ईबीसी-१६७१/५१७९-एस, दि. ३.७.१९७३ व शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. ईबीसी-१६७१/५१७९-एस, दि.१५.२.१९७४ व शासन निर्णय क्र. शिक्षण सेवा योजना विभाग एमआयएस-१०८१/८७०/जीईएन-५, दि. २/९/८२ अन्वये राज्यामध्ये ११ शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह (ई.बी.सी) सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ही वसतिगृहे शासनामार्फत चालविली जातात. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची कमाल प्रवेश क्षमता १०० आहे व त्यामध्ये शासनाने निश्चित केलेल्या आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो. प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क दयावे लागत नाही. प्रवेशित विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची सोय मोफत केली जाते. राज्यात ही वसतिगृहे खालील ठिकाणी सुरू आहेत.

अ.क्रं. वसतीगृहाचेनाव प्रवेश क्षमता
अ.क्रं.
वसतीगृहाचेनाव
मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टयामागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, मालेगाव, जि. नाशिक
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
वसतीगृहाचेनाव
मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टयामागासवर्गीय मुलांचेवसतीगृह, शहादा, जि. नंदुरबार
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
वसतीगृहाचेनाव
मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टयामागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, यवतमाळ
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
वसतीगृहाचेनाव
मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टयामागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, अमरावती.
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
वसतीगृहाचेनाव
मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्यामागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, बुधगाव, जि. सांगली
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
वसतीगृहाचेनाव
मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टयामागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, कोल्हापूर
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
वसतीगृहाचेनाव
मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टयामागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, नांदेड
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
वसतीगृहाचेनाव
मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्यामागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, बीड
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
वसतीगृहाचेनाव
मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्यामागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, जव्हार, जि. पालघर
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
१०
वसतीगृहाचेनाव
मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टयामागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, वरोरा, जि. चंद्रपूर
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
११
वसतीगृहाचेनाव
मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टयामागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, वर्धा
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
वसतीगृहाचेनाव
एकूण
प्रवेश क्षमता
११००

योजनचे लाभार्थी :- आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विदयार्थी.

कार्यवाही :- वार्षिक परिक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी वसतिगृह प्रमुखांकडे अर्ज करावयाचे असतात. प्रवेश निश्चित करण्यासाठी गठीत केलेल्या निवड समितीद्वारे प्रवेश दिले जातात.

योजनचे नाव :- मुंबई येथील शासकीय वसतिगृहे

योजनचे उदिदष्टे :- मुंबई बाहेरील व विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुंबई येथील शासकीय महाविदयालयात शिक्षण घेण्याकरिता वसतिगृहाची सोय उपलब्ध करून देणे,

योजनचे स्वरूप :- महाराष्ट्र शासनाने मुंबई बाहेरून व विशेषतः ग्रामीण भागातून महाविदयालयीन शिक्षण घेण्यासाठी मुंबईत येणा-या विद्यार्थ्यांची मुंबईत निवासाची सोय होणे कठीण असते आणि म्हणून या विदयार्थ्यांच्या निवासाच्या सोयीसाठी शासनाने मुंबई येथील शासकीय महाविदयालये आणि शासकीय संस्था येथील विद्यार्थ्यांसाठी मुंबईमध्ये ३ शासकीय वसतिगृहांची सोय केलेली आहे. सदरच्या ३ वसतिगृहांपैकी ०२ वसतिगृहे मुलींसाठी व १ वसतिगृहे मुलींसाठी आहेत. शासन निर्णय दि.२३.५.२०१६ मधील नियमानुसार वरील वसतिगृहात प्रवेश व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

अ.क्रं. वसतिगृहाचे नाव/ठिकाण लाभार्थी प्रवेश क्षमता
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव/ठिकाण
सावित्रीबाई फुले महिला छात्रालय, चनीरोड, मुंबई
लाभार्थी
महिलांसाठी
प्रवेश क्षमता
४५०
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव/ठिकाण
शासनाचे तेलंग स्मारक मुलींचे वसतिगृह, सी रोड चर्चगेट, मुंबई
लाभार्थी
महिलांसाठी
प्रवेश क्षमता
२५०
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव/ठिकाण
शासकीय मुलांचे वसतिगृह, सी रोड, चर्चगेट मुंबई
लाभार्थी
मुलांसाठी
प्रवेश क्षमता
३६०

योजनचे लाभार्थी :- मुंबई बाहेरील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी/विद्यार्थीनी

योजनचे नाव :- शासकीय महाविदयालये/संस्था/अध्यापक महाविदयालये संलग्नित वसतिगृहे

योजनचे उदिदष्टे :-  राज्यातील प्रत्येक जिल्हयातील विद्यार्थ्यांनाशासकीय महाविदयालयात शिक्षण घेण्याकरिता वसतिगृहाची सोय उपलब्ध करून देणे.

योजनेचे स्वरूप :- सदर वसतिगृहे ही शासनाची असून या वसतिगृहांमध्ये शासन निर्णयाप्रमाणे प्रवेश व सोयी सुविधा दिल्या जातात. राज्यात एकूणशासकीय अध्यापक महाविदयालये-१२, शासकीय संस्था-७ व शासकीय कला, वाणिज्य विज्ञान, विधी महाविदयालये-८ आहेत. त्यापैकी खालील ठिकाणी मुले व मुलींसाठी वसतिगृहे आहेत.

अ.क्रं. वसतिगृहाचे नाव प्रवेश क्षमता
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय, छत्रपती संभाजीनगर
प्रवेश क्षमता
६०
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय ज्ञान विज्ञान महाविदयालय, छत्रपती संभाजीनगर
प्रवेश क्षमता
१०५
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय विज्ञान संस्था छत्रपती संभाजीनगर
प्रवेश क्षमता
६०
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय विज्ञान संस्था, नागपूर
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय रत्नागिरी जुने मुलांचे वसतिगृह
प्रवेश क्षमता
४०
अ.क्रं.
शासकीय अध्यापक महाविदयालय रत्नागिरी नवीन मुलांचे वसतिगृह
वसतिगृहाचे नाव
५०
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय, पनवेल
प्रवेश क्षमता
२५
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय, अकोला
प्रवेश क्षमता
४२
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय, यवतमाळ
प्रवेश क्षमता
८०
अ.क्रं.
१०
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय, बुलढाणा
प्रवेश क्षमता
३०
अ.क्रं.
११
वसतिगृहाचे नाव
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, पुर्व मुलांचे वसतिगृह, अमरावती
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
१२
वसतिगृहाचे नाव
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, पश्चिम मुलांचे वसतिगृह, अमरावती
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
१३
वसतिगृहाचे नाव
राजाराम महाविदयालय, कोल्हापूर
प्रवेश क्षमता
८४
अ.क्रं.
१४
वसतिगृहाचे नाव
श्रीम.म.ता.शासकीय अध्यापक महाविदयालय, कोल्हापूर
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
१५
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय, अंबाजोगाई, जि. बीड
प्रवेश क्षमता
२०
अ.क्रं.
१६
वसतिगृहाचे नाव
इस्माईल युसूफ मुलांचे वसतीगृह, जोगश्वरी, मुंबई
प्रवेश क्षमता
१४०
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
एकूण
प्रवेश क्षमता
१२३६
अ.क्रं. वसतिगृहाचे नाव प्रवेश क्षमता
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय, छत्रपती संभाजीनगर
प्रवेश क्षमता
१८
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय ज्ञान विज्ञान महाविदयालय, छत्रपती संभाजीनगर
प्रवेश क्षमता
६०
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय विज्ञान संस्था छत्रपती संभाजीनगर
प्रवेश क्षमता
६०
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय विज्ञान संस्था, नागपूर
प्रवेश क्षमता
१५०
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय, नवीन मुलींचे रत्नागिरी
प्रवेश क्षमता
५०
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय, पनवेल
प्रवेश क्षमता
१५
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय अकोला
प्रवेश क्षमता
४२
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय, यवतमाळ
प्रवेश क्षमता
८०
अ.क्रं.
१०
वसतिगृहाचे नाव
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, नवीन मुलींचे वसतिगृह, अमरावती
प्रवेश क्षमता
१००
अ.क्रं.
११
वसतिगृहाचे नाव
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, जुने मुलींचे वसतिगृह, अमरावती
प्रवेश क्षमता
६०
अ.क्रं.
१२
वसतिगृहाचे नाव
राजाराम महाविदयालय, कोल्हापूर
प्रवेश क्षमता
४५
अ.क्रं.
१३
वसतिगृहाचे नाव
शासकीय अध्यापक महाविदयालय भंडारा
प्रवेश क्षमता
५०
अ.क्रं.
वसतिगृहाचे नाव
एकूण
प्रवेश क्षमता
८३०

योजनचे नाव :- भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र

योजनचे उद्दिष्टये :- अखिल भारतीय प्रशासकीय सेवामध्ये महाराष्ट्रातील विदयार्थ्यांचे प्रमाण वाढविण्याकरिता केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या नागरी सेवापूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी महाराष्ट्रातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळावे यासाठी महाराष्टात प्रथमतः १९७६ मध्ये मुंबई येथे राज्य व्यवसाय शिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर शासन निर्णय आय.ए.एस.१०८४/२८६०७/(६१/८४) विशि-१, दि.३०.९.१९८५ नुसार नागपूर, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर तसेच शासन निर्णय क्र.आय.ए.एस-२००९/प्र.क्र.३५/०९/मशि-२ दि.१७.६.२०१३ अन्वये नाशिक व अमरावती येथे भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत.

योजनचे स्वरूप :-  महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत सदरील केंद्रांचे कामकाज चालते. राज्यभरामध्ये राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रे नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर अशी एकूण सहा प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत. सदर केंद्रांची प्रवेश क्षमता खालीलप्रमाणे आहे.

अ.क्रं. प्रशिक्षण केंद्राचे नाव केंद्रातील मुळ प्रवेश क्षमता बार्टी अनुदानित अल्पसंख्यांक अनुदानित एकूण प्रवेश क्षमता
अ.क्रं.
प्रशिक्षण केंद्राचे नाव
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई
केंद्रातील मुळ प्रवेश क्षमता
१००
बार्टी अनुदानित
१०
अल्पसंख्यांक अनुदानित
१०
एकूण प्रवेश क्षमता
१२०
अ.क्रं.
प्रशिक्षण केंद्राचे नाव
भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, नागपूर
केंद्रातील मुळ प्रवेश क्षमता
१००
बार्टी अनुदानित
१०
अल्पसंख्यांक अनुदानित
१०
एकूण प्रवेश क्षमता
१२०
अ.क्रं.
प्रशिक्षण केंद्राचे नाव
भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर
केंद्रातील मुळ प्रवेश क्षमता
६०
बार्टी अनुदानित
१०
अल्पसंख्यांक अनुदानित
१०
एकूण प्रवेश क्षमता
८०
अ.क्रं.
प्रशिक्षण केंद्राचे नाव
भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर
केंद्रातील मुळ प्रवेश क्षमता
६०
बार्टी अनुदानित
१०
अल्पसंख्यांक अनुदानित
१०
एकूण प्रवेश क्षमता
८०
अ.क्रं.
प्रशिक्षण केंद्राचे नाव
भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक
केंद्रातील मुळ प्रवेश क्षमता
६०
बार्टी अनुदानित
१०
अल्पसंख्यांक अनुदानित
एकूण प्रवेश क्षमता
७०
अ.क्रं.
प्रशिक्षण केंद्राचे नाव
भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती
केंद्रातील मुळ प्रवेश क्षमता
६०
बार्टी अनुदानित
१०
अल्पसंख्यांक अनुदानित
एकूण प्रवेश क्षमता
७०

योजनचे लाभार्थी :- वर नमुद केल्यानुसार प्रत्येक केंद्रात १०० किंवा ६० पदवीधर विदयार्थी, बार्टी कोट्यातून १० व अल्पसंख्यांक कोटयातून १०

 कार्यवाही :- शासन निर्णय क्रमांक प्रीआय ५४१९/प्र.क्र.२४०/मशि-२ दि.१.११.२०२२ अन्वये राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व सर्व भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व अमरावती तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांतर्गत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकॅडमी, पुणे, अंबरनाथ नगरपालिकेचे स्पर्धा परिक्षा केंद्र अंबरनाथ, ठाणे महानगरपालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्था, ठाणे ई. केंद्रांची एकत्रित सामाईक प्रवेश परिक्षा घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांमधून गुणवत्तेच्या व शासनाने विहित केलेल्या आरक्षणाच्या आधारे विदयार्थ्यांनी दिलेल्या विकल्पानुसार सबंधित केंद्रामध्ये पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षणाकरिता प्रवेश देण्यात येतो. प्रशिक्षण कालावधीचे सत्र साधारणतः माहे डिसेंबर/जानेवारी ते मे असे असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परिक्षा उत्तीर्ण होणा-या विदयार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

योजनचे नाव :- प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह योजना

योजनचे उदिदष्टे :- मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मुलींची
वसतिगृहे सुरू करणे.

योजनचे स्वरूप :- भारताच्या माजी पंतप्रधन स्व. इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ इ.स. २००० सालापर्यंत राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० ते १०० मुलींची सोय असलेली प्रियदर्शिनी वसतिगृहे सुरू करण्याचा धारेणात्मक निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण आणि सेवायोजन विभाग क्रमांक. टीडब्ल्यु/१०९०/१५६१३३/ (४१) विशि-५ दि.१८.९.१९९० व शासन निर्णय क्र.टीडब्ल्युएच-१०९४/मशि-४ दि.३१.७.१९९५ मधील तरतुदीनुसार राज्यातील २१ स्वयंसेवी संस्थांना प्रियदर्शिनी वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे.

सदरची वसतिगृहे ही सेवाभावी संस्थांना चालविण्यासाठी दिली जातात. उच्च माध्यमिक ते पदवी स्तरावरील व तंत्रशिक्षणामधील अभ्यासक्रम शिकणा-या विद्यार्थीनींना वसतिगृहात प्रवेश दिला जातो. प्रत्येक वसतिगृहात जास्तीत जास्त ५० विद्यार्थीनींना प्रवेश दिला जातो. विद्यार्थीनीस वसतिगृहात निवासाकरिता कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शासन निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग क्रमांक वसति-२०१०/प्र.क्र.३०५/१०/मशि-२ दि.५.७.२०१३ अन्वये वसतिगृहात राहणा-या विद्यार्थीनींना शासनाकडून देण्यात येणा-या परिरक्षण (परिपोषण) दरमहा भत्यात व अधिक्षिकेच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे. प्रत्येक विद्याथीनींना दरमहा रूपये ९०० (शैक्षणिक वर्षातील १० महिन्यांकरिता) व वसतिगृह अधिक्षिकेस रूपये ४५०० इतके मानधन देण्यात येते.

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त राज्यात विविध २१ ठिकाणी प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात आलेले आहेत. त्यापैकी १५ सुरू आहेत. राज्यात ही वसतिगृहे खालील ठिकाणी सुरू आहेत.

अ.क्रं. वसतीगृहाचे नाव प्रवेशक्षमता
अ.क्रं.
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, शिरपुर, ता. शिरपुर, जि.धुळे.
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, आष्टी, ता. आष्टी, जि.बीड
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, कन्नड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद.
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, भोकरदन, ता. भोकरदन, जि.जालना.
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, नांदेड, ता.जि. नांदेड
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, किनवट, ता. किनवट, जि. नांदेड.
प्रवेशक्षमता
१००
अ.क्रं.
१०
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, वसंतनगर कोटग्याळ, ता.मुखेड, जि.नांदेड
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
११
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, चव्हाणवाडी, ता. मुखेड, जि. नांदेड.
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
१२
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, अमहदपुर, ता. अहमदपुर, जि.लातूर.
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
१३
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
१४
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, घांटजी, ता. घांटजी, जि.यवतमाळ.
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
१५
वसतीगृहाचे नाव
प्रियदर्शिनी मुलींचे वसतीगृह, नेरपरसोपंत, ता. नेरपरसोपंत, जि. यवतमाळ.
प्रवेशक्षमता
५०
अ.क्रं.
वसतीगृहाचे नाव
एकुण
प्रवेशक्षमता
८००

योजनचे लाभार्थी :- सबंधित तालुक्यातील रहिवासी ५० विद्याथींनी

योजनचे मंजुरीसाठी करावयाचा अर्ज :-  नवीन वसतिगृह सुरू करण्यासाठी सबंधित सेवाभावी संस्थांनी आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज प्रत्येक वर्षी विभागीय सहसंचालकांमार्फत शिक्षण संचालनालय (उच्च शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे १६ या कार्यालयाकडे पाठवावयाचे आहेत.

अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार :- सेवाभावी संस्थांना ५० मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यासाठी मान्यता देण्याचे अंतिम अधिकार शासनाकडे आहेत