क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महात्मा ज्योतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून प्रकाशित “महात्मा फुले समग्र वाड्मय” पुन:मुद्रित ग्रंथाचे प्रकाशन आणि वितरण मा. श्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी केले.
यावेळी विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आ. छगन भुजबळजी, आ. हेमंतजी रासने, उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महात्मा फुले यांचे जीवनचरित्र प्रत्येकाला कळावे, यासाठी हा चरित्र ग्रंथ कायमस्वरूपी अल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही यावेळी दिली.