DHE Pune

Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP)

SNDT महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई यांच्या सहकार्याने उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित एक-दिवसीय Apprenticeship Embedded Degree Program (AEDP) कार्यशाळा – २०२५

१६ एप्रिल २०२५ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाने Curriculum and Credit Framework for Undergraduate Progarmmes (CCFUT) या मार्गदर्शक तत्वांमध्ये लवचिक श्रेयांक पद्धती, बहुप्रवेश व बहुनिर्गमन विकल्प आणि बहुविद्याशाखीय अभ्यास पद्धतीचा समावेश केला आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील परिच्छेद क्र.१६.७ मध्ये उच्च शिक्षणातील अध्ययनामध्ये Apprenticeship ची महत्वाची भूमिका खालीलप्रमाणे अधोरेखित केली आहे.

“……Different models of vocational education, and apprenticeships, will also be experimented by higher education institutions……”.

या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) संदर्भात मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेली आहेत. या मार्गदर्शक तत्वामध्ये अध्ययन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण यांच्यामध्ये असलेली दरी कमी करणे, शिक्षण आणि उद्योग यांच्यात संवाद निर्माण करून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे इ. बाबत नमूद करण्यात आले आहे.

या अनुषंगाने AEDP कार्यक्रम लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे प्र-कुलुगुरू व संबंधित अधिकारी यांच्यासाठी SNDT महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई यांच्या सहकार्याने उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाद्वारे एक-दिवसीय Apprenticeship Embedded Degree Program (AEDP) कार्यशाळा – २०२५ आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, IAS (माननीय अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन), श्री. सीताराम कुंटे, निवृत्त IAS (माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन आणि सदस्य, CRISP गव्हर्निंग बोर्ड), डॉ. विनोद मोहितकर (संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय (DTE), महाराष्ट्र शासन) हे उपस्थित होते. तसेच, डॉ. शैलेंद्र देवळाणकर (संचालक, उच्च शिक्षण संचालनालय (DHE), पुणे) हे Online उपस्थित होते.

सदर कार्यशाळेस श्री. भरत अंबळकर, श्री. अनिल राव, व श्री. महेश दाबक या सुकाणू समितीतील सदस्यांनी मार्गदशन केले. Mr. Deependra Singh Kushwah, IAS (Development Commissioner (Industries) & Exports Commissioner Chairman, MAITRI), Shri. Nitin K. Patil, IAS, (Commissioner, Skill Development, Employment & Entrepreneurship, Government of Maharashtra), व Smt. Manisha Verma, IAS, (Addl. Chief Secretary, Skills Employment Entrepreneuership and Innovation, Government of Maharashtra) यांनी आपली मते मांडली.

SNDT महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई यांच्या वतीने मा. कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा, प्रबंधक डॉ. विलास नांदीवडेकर, व प्राचार्या आदिती सावंत यांनी व डॉ. रुपेश राऊत (सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई विभाग) यांनी आयोजनाचे कामकाज पाहिले.

One-Day Apprenticeship Embedded Degree Program Workshop – 2025 Organized by The Higher & Technical Education Department, Government of Maharashtra In collaboration with SNDT Women’s University, Churchgate, Mumbai