- Skip to main content
- A
- A
- A
- A
-
Home » Awards
योजनचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार :-महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग शासन निर्णय क्र. साफुपु२०११ (१४८/११) समन्वय, १५/ १२/२०११ व शासन निर्णय क्रमांक साफुपु-2024/प्र.क्र.12/716845/मशि-2 दि.02 फेब्रुवारी 2024 नुसार कार्यवाही करणे.
योजनचे उददीष्टे :-गोरगरीब तळागाळातील स्त्रियांचे शिक्षण, महिला सबलीकरण, लहान मुलांचे शिक्षण महिलासांठी सामाजिक परिवर्तनाची कार्य, स्त्रीभ्रुणहत्या प्रतिबंधक कार्य, पल्सपोलिओ माहिमेचे कार्य, दलित आदिवाशी, विमुक्त भटक्या जाती-जमाती गलीच्छ वस्ती सुधारणा, वंचित क्षेत्रातील महिलांकरीता केलेले कार्य, महिला व बाल हक्क यासाठी केलेले कार्य, दिव्यांग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी व नैसर्गिक आपत्तिग्रस्तासाठी केलेले कार्य, अत्याचारीत महिलांना मोफत कायदेविषयक सल्ला देण्याचे कार्य व मोफत आरोग्य सेवा शिबीरे आयोजित करणे, बचत गटाची स्थापना करणे, महिलांसाठी स्वयंरोजगार कुटीर उदयोग सुरु करणे, वृध्द व निराधार महिलांसाठी आश्रम स्थापन करणे, आनाथ बालकासाठी आनाथालये स्थापन करणे, वेश्याव्यवसाय क्षेत्रातील महिलांचे पुनर्वसन करणे व आरोग्य सेवा उपलब्ध करणे, कौटुंबीक अत्याचार ग्रस्त महिलांचे समुपदेशन करणे इ. क्षेत्रात केलेली भरीव कार्य करणा-या समाजसोविकांना त्यांच्या कार्याची पोहोच आणि सदर कार्यापासून प्रेरणा घेण्यासाठी इतरांना प्रोत्साहन या उददीष्टांसाठी ही योजना राबविली जाते.
योजनचे स्वरुप :-संत, महात्मे आणि थोर मोठे राष्ट्रीय नेते, ज्यांनी समाजासाठी आणि उज्वल राष्ट्रनिर्मितीसाठी आपले उभे आयुष्य वेचले अशा व्यक्तीचे जन्मसमारोह राज्यभर साजरे केले जातात. कै. सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या अमूल्य कार्याचा गौरव व त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण रहावे तसेच त्यांच्या कार्याचा वसा पुढील काळात सुरु रहावा या दृष्टीने शासनाने सन १९८०-८१ पासून कै. सावित्रीबाई फुले यांच्या १५० व्या जयंतीनिमीत्त सामाजिक समता, स्त्रीशिक्षण तसेच कमकुवत गटातील मुलामुलीचे शिक्षण या व अशा क्षेत्रामध्ये निरलसपणे व सेवावृत्तीने कार्य करणा-या एका महिलेस रुपये ५००० चा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. सन १९८३-८४ पासून पुरस्कार संख्येत वाढ करण्यात आली. सन १९९१-९२ पासून पुरस्कार संख्या ६ पर्यंत वाढविण्यात आली तदनुसार महाराष्ट्रातील सहा महसूल विभागानुसार सहा महिलांची निवड करण्यात येते.
योजनचे लाभार्थी :- थोर समाजसेविका
योजनचे मंजूरीसाठी कार्यवाही :-मा. शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवड समितीकडून ०६ पुरस्कारार्थीची निवड केली जाते.
अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार सदर :- पुरस्काराकरीता निवड करण्याचा अधिकार शासनास आहे.
योजनचे उददीष्टे :-विद्यापीठीय / महाविद्यालयीन स्तरावरील उच्च व तंत्र व्यवसाय आणि कला क्षेत्रातील शिक्षकांनी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील केलेल्या सेवेच्या योगदानाबददल आणि त्यांच्या कार्यापासून इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी राज्य शिक्षक पुरस्कार दिला जातो.
योजनेचे स्वरुप :-आयुष्यभर ज्ञानदान करुन चांगला नागरिक आणि उत्कृष्ठ राष्ट्र निर्माण करणाऱ्या शिक्षकाला त्यांच्या कार्याचा योग्य गौरव करुन आणि असे आदर्श शिक्षक होण्यास प्रेरणा देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने विद्यापीठ महाविद्यालयीन / कला/ तंत्र/व्यावसाय शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षकांना प्रतीवर्षी 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी राज्य शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. सदर पुरस्कार प्राथमिक, माध्यमिक, शिक्षकांप्रमाणे सन 1990-91 पासून दिला जातो, उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक राशिपु-2012/(139/12)/समन्व्य दि. 26 डिसेबर 2012 अन्वये विद्यापीठीय शिक्षकासाठी 12, शासकीय महाविद्यालये, संस्था, अध्यापक महाविद्यालये येथील शिक्षकांसाठी- 01. तत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत-सर्व शासकीय सव अनुदानित अभियांत्रीकी महाविद्यालये स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालये यामधील शिक्षकासांठी ०2. सर्व शासकीय तंत्रनिकेतने येथील शिक्षकांसाठी-०३. औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील शिक्षकांकरीता 6, व्यवसाय शिक्षण संचालनालय (तंत्रशाळा) यामधील शिक्षकांसाठी 6, कला शिक्षण (चित्रकला/उपयोजित कला) संचालनालयाच्या अखत्यारित शासकीय अनुदानित चित्रकला/उपयोजित कला महाविद्यालये येथील शिक्षकांकरीता -01, असे एकुण 31 आदर्श पुरस्कार देण्यात येतात. उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. पुरस्का-2612/(प्र.क्र. 182/13)/ समन्वय दिनांक. 16.02.2015 अन्वये शासनाने सन 2012-2013 पासून आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रत्येक शिक्षकास रु. 10,000/- वरुन रु. 25,000/- इतक्या रोख रकमेचे पारितोषिक देण्यास मंजूरी दिलेली आहे.
योजनचे लाभार्थी :-विद्यापीठ / महाविद्यालय स्तरावरील उच्च व तंत्र, व्यवसाय आणि कला क्षेत्रातील शिक्षक
पुरस्कारासाठी करावयाचा अर्ज :-राज्य शिक्षक पुरस्काराकरिता शिफारस करावयाच्या व्यक्तींची निवड करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर गठीत केलेल्या निवड समितीकडे महाविद्यालय आणि विद्यापीठातील संबंधित विभागाने अर्ज करावयाचा असतो. मा. शिक्षण मंत्री (उच्च शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार निवड समितीकडून पुरस्कारार्थीची निवड केली जाते.
अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार :-सदर पुरस्काराकरीता निवड करण्याचा अंतिम अधिकार शासनास आहे.
योजनेची उददीष्टेः-संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्याकरीता ज्या व्यक्तीनी संस्कृत विषयात योगदान केलेले आहे. अशा संस्कृत पंडितांना पुरस्कार देणे.
योजनेचे स्वरुप:-संस्कृत भाषा ही सर्व भाषाची जननी असून भारताची मूलभूत भाषा आहे. सदर भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्याकरीता ज्या व्यक्तीने संस्कृत विषयात योगदान केलेले आहे. केंद्र शासनाच्या निर्णयानुसार १९७२ पासून दरवषी श्रावणी पोणिमेस म्हणजेच नारळी पोर्णिमेस संस्कृत दिवस समारोह साजरा करण्यात येतो. त्यादिवशी महाराष्ट्रातील पाच व अन्य राज्यातील ०१ अशा ०६ संस्कृत पंडितांना सन १९९६- ९७ पासून प्रती पुरस्कार रुपये २५,०००/- व मानपत्र तसेच संस्कृत विषयात विशेष नैपुण्य दाखविलेल्या बी.ए. व एम ए च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये १०००/- देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतो, सन १९९९-२००० पासून सदर पुरस्कारार्थीची संख्या राज्यातील ०५ वरुन ०७ करण्यात आली असून परराज्यातील ०१ असे एकूण ०८ पुरस्कार देण्यात येतात.
योजना लाभार्थी :- संस्कृत पंडित
पुरस्कारासाठी करावयाचा अर्ज :-संस्कृत विषयामध्ये योगदान करणा या संस्कृत पंडितांची माहिती श्री. बिराजदार, मानसेवी संस्कृत संघटक यांचेकडे पाठवावयाची असून सदर संघटकाकडून संस्कृत पंडितांची माहिती संकलित करुन याबाबतचा प्रस्ताव मानसेवी संघटकाकडून शिक्षण संचालनालय (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांचेकडे पाठविला जातो. सदर प्रस्तावाची छाननी करुन शिक्षण संचालनालयाकडून सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविला जातो. मा शिक्षण मंत्री (उच्च शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या संस्कृत पंडीत पुरस्कारार्थीच्या निवड समितीकडून ८ व्यकीची पुरस्कारांकरिता निवड केली जाते
अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार :-सदर पुरस्काराकरिता निवड करण्याचा अधिकार शासनाकडे आहे.