1. योजनेचे नाव:- लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समिती
2. योजनेचे उददीष्ट:- लोकमान्य टिळक यांच्या विषयक साहित्याचे ग्रंथाव्दारे प्रकाशन करणे.
3. योजनेचे स्वरुप:- देशाच्या राजकीय तसेच सामाजिक चळवळीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव देखील अग्रगण्य आहे. स्वराज्याचे उदगाते राष्ट्रीय चळवळीचे जनक, गणित तज्ञ, खगोल शास्त्राचे अभ्यासक, प्रतिभावंत पत्रकार, भारतीय असंतोषाचे जनक, श्रीमदभागवतगीतेचे भाष्यकार अशा कितीतरी उपाधींनी ज्ञात असलेले लोकमान्य टिळक यांचे साहित्य अधिकाधिक लोकांपर्यत पोहचविण्याकरीता त्यांचे साहित्यांचे प्रकाशन करण्याकरीता शासन निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग क्र-2020/(78/20) / आस्था-2/दि -01 ऑगस्ट, 2020 अन्वये लोकमान्य टिळक चरित्र साधने चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदरहू कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी समितीस वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येते. मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण हे सदरहू समितीचे अध्यक्ष असतात.
४. योजना लाभार्थी :- सदर प्रकाशन साहित्य आमजनतेस खुले आहे.
५. प्रकाशित साहित्याची उपलब्धता:- या समितीतर्फे प्रकाशित करण्यात येणारे साहित्य/ग्रंथ शासकीय ग्रंथगार पुणे, नागपुर, औरंगाबाद व कोल्हापूर येथे विक्रीस उपलब्ध असतात.