DHE Pune

Committes

योजनेचे नाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती

योजनेची उददीष्टे :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लिखाण, भाषणे, पत्रव्यवहार व संदर्भ साहित्य आणि त्यांचे मराठी हिंदी, इंग्रजी अनुवाद प्रकाशित करणे.

योजनेचे स्वरुप :-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तुत्वाचा आणि राजकीय सामाजिक प्रयोगांचा आदर्श तितकाच महत्वाचा आहे. भारतीय प्रशासनात आणि सामाजिक सुधारणांत प्रागतिक बदल घडवून आणणा-या या थोर महापुरुषाचे चरित्र आणि कार्य नव्या पिढीला आणि राज्यकर्त्यांना प्रेरणादाई आहे, त्याचबरोबर सनदी कर्मचारी वर्गाला, व्यवस्थापन विद्येच्या प्रगत अभ्यासकांना, त्यांच्या कारकिर्दीतील अनुभवांचा, प्रयोगांचा आणि दस्तऐवजांचा व संदर्भ सामुग्रीच्या संकलन, संपादन व प्रकाशनाचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितची स्थापना शिक्षण व युवक सेवा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 1071/89979-अठठाविस (372) दि. 15.03.1976 अन्वये स्थापना करण्यात आलेली आहे. सदरचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी समितीस मुदतवाढ देण्यात येते. .

योजना लाभार्थी :- सदर प्रकाशन साहित्य आमजनतेस खुले आहे.

प्रकाशित साहित्याची उपलब्धता :-  या समितीतर्फे प्रकाशित करण्यात आलेले साहित्य/ग्रंथ शासकीय ग्रंथगार पुणे, नागपुर, औरंगाबाद व कोल्हापूर येथे जनतेला विकत मिळतात.

१. योजनेचे नाव :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती

२. योजनेची उददीष्टे :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लिखाण, भाषणे, पत्रव्यवहार व संदर्भ साहित्य आणि त्यांचे मराठी हिंदी, इंग्रजी अनुवाद प्रकाशित करणे.

३. योजनेचे स्वरुप :-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तुत्वाचा आणि राजकीय सामाजिक
प्रयोगांचा आदर्श तितकाच महत्वाचा आहे. भारतीय प्रशासनात आणि सामाजिक सुधारणांत प्रागतिक बदल घडवून आणणा-या या थोर महापुरुषाचे चरित्र आणि कार्य नव्या पिढीला आणि राज्यकर्त्यांना प्रेरणादाई आहे, त्याचबरोबर सनदी कर्मचारी वर्गाला, व्यवस्थापन विद्येच्या प्रगत अभ्यासकांना, त्यांच्या कारकिर्दीतील अनुभवांचा, प्रयोगांचा आणि दस्तऐवजांचा व संदर्भ सामुग्रीच्या संकलन, संपादन व प्रकाशनाचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितची स्थापना शिक्षण व युवक सेवा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 1071/89979-अठठाविस (372) दि. 15.03.1976 अन्वये स्थापना करण्यात आलेली आहे. सदरचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी समितीस मुदतवाढ देण्यात येते.

४. योजना लाभार्थी :- सदर प्रकाशन साहित्य आमजनतेस खुले आहे.

५. प्रकाशित साहित्याची उपलब्धता :-

या समितीतर्फे प्रकाशित करण्यात आलेले साहित्य/ग्रंथ शासकीय
ग्रंथगार पुणे, नागपुर, औरंगाबाद व कोल्हापूर येथे जनतेला विकत मिळतात.

1. योजनेचे नाव:- राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती :

2. योजनेचे उददीष्ट :- राजषी शाहू महाराज यांच्या विषयक साहित्याचे ग्रंथाव्दारे प्रकाशन करणे.

3-योजनेचे स्वरुप :-

महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक बांधणीत राजर्षि शाहू महाराज यांचे योगदान आहे. आजही राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि राजकीय, सामाजिक प्रयोगांचा नमुना उपयोगी आहे, महाराष्ट्र शासनाने राज्याच्या पुरोगामित्वाची जडणघडण करण्यास प्रेरणादायी ठरलेल्या या आदिनेत्याची ओळख जागविण्यासाठी विशेष कृती-प्रकल्प हाती घ्यावा, उ‌द्देशाने राजर्षीशाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना शासन निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, दिनांक-30.9.2008 अन्वये केली आहे, सदरहू कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी समितीस वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येते. सदरहू समितीचे अध्यक्ष हे मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण हे असतात.

4. योजनेचे लाभार्थी :- सदर प्रकाशन साहित्य आम जनतेस खुले राहील

५. प्रकाशित साहित्याची उपलब्धता:- या समितीतर्फे प्रकाशित करण्यात आलेले साहित्य/ग्रंथ शासकीय ग्रंथगार पुणे, नागपुर, औरंगाबाद व कोल्हापूर येथे जनतेला विकत मिळतात.

1. योजनेचे नाव-

महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती

2. योजनेचे उददीष्ट-

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या विषयक साहित्याचे ग्रंथाव्दारे प्रकाशन करणे.

3. योजनेचे स्वरुप –

महाराष्ट्राच्या वैचारीक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक बांधणीत महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, न्या. रानडे अशा अनेक समाजधुरीणांचे योगदान आहे. या सर्वांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांची थेट मदत होती. महाराष्ट्र शासनाने राज्याच्या पुरोगामीत्वाची जडणघडण करण्यास प्रेरणादायी ठरलेल्या या आदिनेत्याची ओळख जागविण्यासाठी विशेष कृती-प्रकल्प हाती घ्यावा या उददेशाने शासन निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग क्र- संकीर्ण-1111/(प्र.क्र. 81/16)/ समन्वय/दिनांक-17 आक्टोंबर, 2016 अन्वये महाराजासयाजीराव चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदरहू कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी समितीस वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येते.

४. योजना लाभार्थी :- सदर प्रकाशन साहित्य आमजनतेस खुले आहे.

५. प्रकाशित साहित्याची उपलब्धता:- या समितीतर्फे प्रकाशित करण्यात आलेले साहित्य/ग्रंथ शासकीय ग्रंथगार पुणे, नागपुर, औरंगाबाद व कोल्हापूर येथे जनतेला विकत मिळतात.

1. योजनेचे नाव- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती

2. योजनेचे उददीष्ट- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयक साहित्याचे ग्रंथाव्दारे प्रकाशन करणे.

3. योजनेचे स्वरुप-

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषाशी संबधित सर्व अप्रकाशित
साहित्य, लेखन, संशोधनाचे काम पुर्णत्वास नेण्यासाठी, शासन निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग क्र-लोअसा-1212/(प्र.क्र.140) / समन्वय/ दिनांक 16 जून, 2014 अन्वये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना करण्यात आली आहे., सदरहू कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी समितीस वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येते.
सदरहू समितीचे अध्यक्ष मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण हे असतात.
४. योजना लाभार्थी : सदर प्रकाशन साहित्य आमजनतेस खुले आहे.

५. प्रकाशित साहित्याची उपलब्धता: या समितीतर्फे प्रकाशित करण्यात आलेले साहित्य/ग्रंथ शासकीय ग्रंथगार पुणे, नागपुर, औरंगाबाद व कोल्हापूर येथे जनतेला विकत मिळतात.

1. योजनेचे नाव:- छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती

2. योजनेचे उददीष्ट:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयक साहित्याचे ग्रंथाव्दारे प्रकाशन करणे.

3. योजनेचे स्वरुपः-

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तुत्वाचा आणि राजकीय सामाजिक प्रयोगांचा आदर्श तितकाच महत्वाचा आहे. भारतीय प्रशासनात आणि सामाजिक सुधारणांत प्रागतिक बदल घडवून आणणा-या या राजाचे चरित्र आणि कार्य नव्या पिढील आणि राज्यकर्त्यांना प्रेरणादाई आहेच, परंतु सनदी कर्मचारी वर्गाला, व्यवस्थापन विद्येच्या प्रगत अभ्यासकांना, वास्तुविशारदांना, कायदे पंडितांना आणि अर्थतज्ञांना महाराजांच्या राजकीय कारकिर्दीतील अनुभवांचा, प्रयोगांचा आणि दस्तऎवजांचा व संदर्भ सामुग्रीच्या संकलन, संपादन व प्रकाशनाचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितची स्थापना शासन निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग क्र-2020/(80/20)/आस्था-2/दिनांक-01 ऑगस्ट, 2020 अन्वये करण्यात आली आहे. सदरहू कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी सदरहू समितीस शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येते, सदरहू समितीचे अध्यक्ष-मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण हे आहेत.

४. योजना लाभार्थी :- सदर प्रकाशन साहित्य आमजनतेस खुले आहे.

५. प्रकाशित साहित्याची उपलब्धता:- या समितीतर्फे प्रकाशित करण्यात येणारे साहित्य/ग्रंथ शासकीय ग्रंथगार पुणे, नागपुर, औरंगाबाद व कोल्हापूर येथे विक्रीस उपलब्ध असतात.

1. योजनेचे नाव:- लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समिती

2. योजनेचे उददीष्ट:- लोकमान्य टिळक यांच्या विषयक साहित्याचे ग्रंथाव्दारे प्रकाशन करणे.

3. योजनेचे स्वरुप:- देशाच्या राजकीय तसेच सामाजिक चळवळीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव देखील अग्रगण्य आहे. स्वराज्याचे उदगाते राष्ट्रीय चळवळीचे जनक, गणित तज्ञ, खगोल शास्त्राचे अभ्यासक, प्रतिभावंत पत्रकार, भारतीय असंतोषाचे जनक, श्रीमदभागवतगीतेचे भाष्यकार अशा कितीतरी उपाधींनी ज्ञात असलेले लोकमान्य टिळक यांचे साहित्य अधिकाधिक लोकांपर्यत पोहचविण्याकरीता त्यांचे साहित्यांचे प्रकाशन करण्याकरीता शासन निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग क्र-2020/(78/20) / आस्था-2/दि -01 ऑगस्ट, 2020 अन्वये लोकमान्य टिळक चरित्र साधने चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदरहू कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी समितीस वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येते. मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण हे सदरहू समितीचे अध्यक्ष असतात.

४. योजना लाभार्थी :- सदर प्रकाशन साहित्य आमजनतेस खुले आहे.

५. प्रकाशित साहित्याची उपलब्धता:- या समितीतर्फे प्रकाशित करण्यात येणारे साहित्य/ग्रंथ शासकीय ग्रंथगार पुणे, नागपुर, औरंगाबाद व कोल्हापूर येथे विक्रीस उपलब्ध असतात.

योजनेचे नाव- महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती-

महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती, महाराष्ट्र राज्य, पुणे या समितीची उच्च व तंत्रशिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक लोसास/२०२०/प्र.क्र.43/आस्था दिनांक 17.07.2023 अन्वये सदर समितीची पुर्नरचना केलेली आहे.

योजनेचे उददीष्टः मराठी प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन करणे, शासनास सल्ला देणे व असे साहित्य प्रकाशित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे हे या समितीचे कार्य आहे.