DHE Pune

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने जनता खंड ७, ८ आणि ९ तसेच इंग्रजी खंड ४ चा मराठी अनुवाद आणि इतर खंडांचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने जनता खंड ७, ८ आणि ९ तसेच इंग्रजी खंड ४ चा मराठी अनुवाद आणि इतर खंडांचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि श्री. अजितदादा पवार यांच्यासमवेत या प्रकाशन सोहळ्यास मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जनता’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, वंचितांचे अधिकार, सामाजिक समता आणि राष्ट्रनिर्माणाचे विचार प्रभावीपणे मांडले. त्यांचे हे लेखन केवळ ऐतिहासिक नव्हे, तर आजच्या काळातही दिशादर्शक आहे. या खंडांच्या प्रकाशनामुळे बाबासाहेबांचे विचार अधिक व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहोचतील.

या प्रसंगी मंत्रिमंडळातील मंत्री, मुख्य सचिव सुजाता सौनिक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक डॉ. रुपेश राऊत, तसेच डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, संभाजी बिरंजे, योगीराज बागुल आणि इतर समिती सदस्य उपस्थित होते