उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच महात्मा फुले वाडा पुणे इथे महात्मा फुले जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केला गेला.या कार्यक्रमात महात्मा फुले समग्र वाडःमय या पुनर्मुद्रित ग्रंथाचे वितरण करण्यात आले.उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले चरित्रे साधन समिती स्थापना करण्यात आली आहे.या समितीमार्फत महात्मा जोतीराव फुले यांचे जीवन, विचारधारा आणि त्यांचे कार्य या विषयी संशोधन आणि प्रकाशनाचे कामकाज करण्यात येते. या समितीचे मुख्य उद्दिष्ट महात्मा फुले यांच्या विचारांचे संवर्धन करून समाज सुधारक योगदानाची सुसंगत माहिती पुस्तकांच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांना, संशोधकांना, आणि सामान्य वाचकांना उपलब्ध करून देण्यात येते.