DHE Pune

  • Skip to main content

महाराष्ट्र शासन

उच्च शिक्षण संचालनालय

महाराष्ट्र राज्य, भारत

राजभवन बैठक

मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची पार पडलेली आढावा बैठक

१८ जून २०२५ | मुंबई, राजभवन

मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. या बैठकीत नवीन शैक्षणिक धोरण, विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया तसेच विभागाशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गती वाढविणे, शिक्षण संस्थांची कार्यक्षमता सुधारणा आणि विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीस विभागाचे मा. अपर मुख्य सचिव श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, व उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची उपस्थिती लाभली.